<SiteLock

मुलगा पहायला आला

 

Vidya

vidya

"मुलगा पहायला आला"

 मुलगा पाहायला येतो तेव्हा मुलीला काय वाटत असेल? आज मला मुलगा पाहायला आलेला. मुलगा पाहायला येणं म्हणजे नेमकं काय? जेव्हा मुलगी "वयात येते", म्हणजे कि ती प्रेम किंवा मुलांशी मैत्री वगैरे करायला लहान असते मात्र लग्न करून संसार करायला समर्थ असते, तेव्हा तिचा बाप (किंवा घरचा करता पुरुष,..हो फक्त पुरुषच ..कारण हा अधिकार बायकांना नाहीच) हा मुलगा शोधतो ... अर्थातच जातीचा आणि 'स्टेटस' चा (मुलीचं मेंटल, इमोशनल, फिसिकल स्टेटस नाही, ते गेलं चुलीत)..शोधण्याची मोहीम हि वेबसाईटवर तर कमी होते पण काका, मामा, ताईच्या सासऱ्यांच्या बहिणीचा दिराचा मावस भाऊ, अगदी सगळेच, कोणीपण, हे सगळं करतात...काय सुख मिळतं यांना काय माहीत... May be मला वाटतं कि मुलगी वयात आली आहे तर त्यांना sense of pride वाटत असणार कि त्यांनी तिचे कदम "डगमगण्या अगोदरच" तिला वाचवले .. त्यांना कितीही पिण्याचे, दुसऱ्या बायकांचे व्यसन असले तरी मुलीने मात्र स्वतःच्या मनाप्रमाणे मुलगा बघू नये हि त्यांची "निरागस" आशा असते .. असो..

मग मुलगा सुचवायचं कार्यक्रम सुरु झाला कि सर्व decide होत.. मुलगी चुकून नौकरी करत असेल आणि सुट्टी मिळणं अव्हघड असेल या बघण्याच्या कार्यक्रमासाठी तरी ती office मध्ये काही कारण देऊन "स्व-इच्छेने" जाते .. मामा काका भाऊजी या सर्वांना विचारून मात्र दिवस ठरवतात आणि त्या मुलाच्या जॉब प्रमाणे सगळं ठरत कारण कि त्याचा जॉब महत्वाचा .. आणि समजा जर मुलीला जॉब नसेल तर तिला एकाच प्रश्न विचारतात कि "नाश्त्यामध्ये कोणती मिठाई खाशील बाळा? बाप तोपर्यंत मुलाचं नाव पण पूर्ण सांगत नाही कारण कि Facebook वर पोरीने search करू नये म्हणून .. कारण मुलीने उगीच काही "उकरून काढल" तर काय? आणि Facebook तुमचा फक्त चेहरा दाखवत नई तर तुमचे मित्र, लाईक्स, विचार सगळं काही दाखवतं...आणि हे असल काही मुलीला अगोदर कळू नये... मुलीने मुलाला नापसंत केला म्हणजे कि बापासाठी अपमानजनक गोष्ट .. आणि मग मुलीला एवढे superpowers कोणी दिले म्हणून लोकं तोंडात शेण घालतील .. मग आई आत्या यांच्यावर मोठी जबाबदारी असते कि मुलीला नीट नेसावे . असो.

मुलीला पाहुणे आलेत बघायला.. मुलगी शेवटी एक साडी निवडून ती नेसते .. ती नाराज पण नव्हती आणि उत्सुकसुद्धा नव्हती..फक्त हे एकदा सगळं संपायाची वाट बघत असते .. काही दिवसांपासून ती वेगळ्याच दुनियेत होती.. तिला लग्न करायचं नव्हतं .. काहीच interest नव्हता राजा-राणीच्या संसारात .. काही दिवसांपूर्वी जेव्हा तिने लग्न मोडलं होतं तेव्हा तिचं hurt झालेल मन तिला काही विचार नव्हतं करू देत .. सारखं वाटायचं कि जो त्रास दिला अगोदरच्या मुलाने दिला होता तोच त्रास पुन्हा झाला तर.. हो तिच होणारं लग्न मोडलाय याआधी .. मुलाला virgin मुलगी हवी होती .. त्या मुलाने त्या मुलीला अगदी अगोदरच सर्वात पहिले हेच विचारले कि ती virgin आहे कि नाही .. तिने त्याला सगळं काही खरा सांगितलं आपल्या अगोदरच्या प्रेमाबद्दल .. पण मुलाला फक्त virgin कि नाही हेच ऐकायचं होत..तिने त्याला तसं सांगितलं ...कि नाहीये.. . मुलगा थोडा शॉक झाला पण लगेच म्हणाला कि आपण हॉटेल मध्ये रात्रभर राहायला काही हरकत नाही, लग्न तर ठरलेच आहे .. काही दुसर बोलण्या अगोदर मुलाचा हा 'आग्रह'.. तिने जेव्हा घरच्यांना हे सांगितलं तेव्हा घरच्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं .. उलट म्हणाले कि नाही म्हणालीस त्या मुलाच्या "आग्रहाला" म्हणून आता त्यांचा 'ego hurt' झाला असेल.. हि त्यांची काळजी.. अश्या मुलाला जवळ कधीच घ्यायचं नाही असं ठरवून त्या मुलाला नकार दिलाच.. कोणी नातेवाईक सोबतीला आले नाही पण काही मित्र सोबत आले आणि त्या मुलाला शिव्या देऊन लाथ मारून आयुष्यातून बाहेर काढलं .. इतक सगळं झालं ..आणि लगेच २ महिन्यात बापाचं नवीन मुलगा पाहायला सुरुवात .. तेच चक्र पुन्हा सुरु झाले..पण आता लिहायचे थांबवते.. कारण मुलगा पाहायला आलाय .. 

~~~

 

Vidya is a young professional from Maharashtra.

Image Courtesy: The Internet

Other Related Articles

The caste view of 'saffron dollars'
Saturday, 27 November 2021
  Dr. Bhushan Amol Darkase "If anyone throws his glance at the Indian physical and social world as a spectator, he will undoubtedly find this country a home of glaring inequality." -Dr Ambedkar... Read More...
Buddhist Sangha — an embodiment of gender neutrality
Wednesday, 24 November 2021
  Dr Amritpal Kaur  When an ideology for restructuring of human nature and society becomes a religious cult, it not only loses its spirit of rationality and political relevance and its... Read More...
Waatavaran’s ‘Adivasis for Forests’ Initiative
Friday, 19 November 2021
  Waatavaran's 'Adivasis for Forests' Initiative In Partnership With Raigad Administration Receives International Support Rahul Sawant "The larger goal of the Adivasis for Forest is management... Read More...
The revival of 'public conscience'
Thursday, 18 November 2021
  Dr. Bhushan Amol Darkase The survival of Indian democracy depends on the revival of 'public conscience' which Dr. Ambedkar explained as, 'Conscience which becomes agitated at every wrong,... Read More...
Narratives of Dalit Cultural Politics in Telangana
Tuesday, 16 November 2021
   Bhangya Bhukya Vemula Yellaiah's Kakka which was published in Telugu, twenty years ago and now translated in English is a powerful narrative of dalit assertion in Telangana. It is the... Read More...

Recent Popular Articles

Govt. of India should send One Lakh SC ST youths abroad for Higher Education
Monday, 21 June 2021
  Anshul Kumar Men sitting on the pinnacle of the palace "So, I went one day to Linlithgow and said, concerning the expense of education, "If you will not get angry, I want to ask a question. I... Read More...
Reflections On Contemporary Navayana Buddhism - Context, Debates and Theories
Tuesday, 10 August 2021
  The Shared Mirror    PRE RELEASE COPY Reflections on Contemporary Navayāna Buddhism Context, Debates and Theories     Shaileshkumar Darokar Subodh Wasnik bodhi s.r ... Read More...
Conceiving a New Public: Ambedkar on Universities
Saturday, 26 June 2021
Asha Singh & Nidhin Donald Dr. B.R. Ambedkar conceptualizes education as a ‘vital need’ which helps us fight notions of ‘inescapable fate’ or ‘ascriptions of caste or religion’. He... Read More...
Caste management through feminism in India
Friday, 06 August 2021
Kanika S There was a time some 5-6 years ago when feminism tried to undermine Dr Ambedkar by pointing out that he carried a penis.1 Now he is just as fantastically a carrier of feminist ideals... Read More...
Rainbow casteism and racism in the queer community is alienating us
Monday, 28 June 2021
  Sophia I entered the Delhi queer movement in my early 20s, as a complete outsider in terms of language, origin, race, class, and caste identity. I wanted to bring change to the status quo and... Read More...